साजणाच्या साजिरी: नवऱ्यासाठी हृदयस्पर्शी उखाणे (Ukhane For Husband)
प्रेमाच्या वाटेवर पाय ठेवताच नवऱ्या-बायकोच्या नात्यात एक वेगळं विश्व निर्माण होतं. या विश्वात नखरा आणि उखाण्यांच्या खेळणीतून प्रेम, कौतुक आणि सहजता अभिव्यक्त होते. आज आपण अशाच काही हृदयस्पर्शी उखाण्यांसह नवऱ्यावरील आपलं प्रेम जाहीर करू या…
तुझ्यात सगळं विश्व:
- “आकाश जसा पाठीशी, तू तसाच माझ्या आयुष्याचा आधार. तुझ्या खांद्यावर डोकं टेकवून जग जिंकते मी, हार नाही कधी.” – ही उखाण नवऱ्यावरील पूर्ण अवलंबित्व आणि त्याच्या पाठिंब्याचे उजळते चित्र रेखाटते.
- “माहीचा स्वामी चंद्र, माझा स्वामी तू माझा नवरा. तुझ्या प्रेमाच्या प्रकाशात जगते मी, तूच माझा चंद्र, तूच माझं सर्वस्व.” – ही उखाण नवऱ्याला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानण्याचे आणि त्याच्यासोबत असलेल्या पूर्णतेचे वर्णन करते.
- “समुद्र जसा विशाल, तुझ्यात तसाच प्रेमाचा अथांग सागर. तुझ्या प्रेमात डुबते मी, जग भुलते, नवरा तू माझा, दुसरं काही नस.” – ही उखाण नवऱ्याच्या प्रेमाची व्यापकता आणि त्यात मिळणाऱ्या सुखद अंतर्लीनतेचे वर्णन करते.
नवऱ्यासाठी हृदयस्पर्शी उखाणे !!!!
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, ….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
पोर्णिमेचा चंद्र असतो गोल …….समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी …व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने सारे श्रम हरती.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.
प्रेमाच्या राणात, नाचतो मोर, ……..शी केल लग्न, नशीब माझ थोर.
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,…… ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, ……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,…….. ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागे पळतंय,
……… माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय.
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,…. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,…….. आहे माझी ब्युटी क्वीन.
Ukhane For Husband
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,…….. तू फक्त, गोड हास.
गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,…..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
एका वर्षात, महिने असतात बारा…..मुळे वाढलाय, आनंद सारा!
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ……….. चे नाव, कायम ओठी यावे.
गर गर गोल, फिरतो भवरा, ………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.
मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …….. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात.
केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ………. च नाव घेतो, पीडू नका वायफळ.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली ……… माझ्या मनात…
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
जगाला सुवास देत उमलती कळी, …… चं नाव घेतो ……….. च्या वेळी.
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,…. समोर माझ्या, सोण सुद्धा लोखंड.
२ आणि २ होतात चार, …… सोबत करेल मी सुखाचा संसार.
काळी माती हिरवे रान, हृदयात माझ्या….. चे स्थान.
प्रेमाची कविता प्रेमाचा लेख, ……माझी लाखात एक.
माझ्याशी लग्न करायला… झाली राजी, केल मी लग्न…..झाली माझी.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
Ukhane For Husband
………..च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
……….ला पाहून, पडली माझी विकेट.
स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, …समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ..मला मिळाली आहे अनुरूप.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……
सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
पक्षांचा थवा, दिसतो छान, … आली जीवनात, वाढला माझा मान.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …आहे माझे जीवन-सर्वस्व.
दही चक्का तुप, … आवडते मला खुप.
नंदनवनात अमृताचे कलश, …आहे माझी खुप सालस.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …. चे नाव घेतो ….च्या घरात.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,
…चे नावं घेतो …च्या घरी.
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार …च्या गळ्यात.
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन.