Makar Sankranti Wishes In Marathi 2024 | संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!! पौष महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जाणारा सण म्हणजे मकर संक्रांत या सणाला एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलायचे सांगून शुभेच्छा दिल्या जातात आणि या शुभेच्छा आपण अनेक प्रकारे देतो तर या लेखात सुद्धा मकर संक्रात साठी काही शुभेच्छा लिहिलेल्या आहेत, तर आशा करतो आपल्याला आवडतील या शुभेच्छा.


😊तिळगुळ घ्या गोड बोला😊
आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
😊तिळगुळ घ्या गोड़ बोला.😊

मधुर वाणीचा, 
रंग उडत्या पतंगाचा, 
बंध दाटत्या नात्यांचा, 
आणि शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या.
 
गोड गुळात एकत्र होईल तीळ, 
उडेल पतंग आणि खुलेल मन, 
प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. 
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात 
तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. 
मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
 
गोड मित्रा चल उगवला आहे दिनकर
चल एकत्र भेटून उडवूया पतंग मिळून 
आकाशात भरारी घेऊया, संक्रांतीच्या शुभेच्छा लुटूया
 
हृदयातील कटूता सगळी विसरुनी 
तीळगुळाचा गोडवा यावा, 
दुःखे हरावी सारी अन 
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
 
गूळ आणि तीळाचा गोडवा, 
आकाशात उडणारे उंच उंच पतंग, 
या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग… 
 
गुळपोळी खाऊ आणि जाडजूड होऊ…
मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा.
 
रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद
आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
नात्यांमध्ये येईल उब, 
आयुष्यात येवो गूळाचा गोडवा, 
मकर संक्रांतीच्या तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा.!!!

तिळगुळ तर हवेतच,
पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!

मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा,जीवन असावे तिळगुळासारखे,“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
😊तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला😊


बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
😊मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.😊


आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!💐


विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!


Makar Sankranti Chya shubhechhya Marathi
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
😊तिळगुळ घ्या गोड गोड बोला.😊

प्रेम आहे ढीगभर
छोट्याशा तिळात
गोडवा आहे मणभर
गोड गुळात
राहो निरंतर
आपुलकी आपल्यात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

नात्यात मधुरता आणेल
लाडू तिळगुळाचा
साजरा करुया
साज या सणाचा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

नेसून येईल काळी साडी
दागिने असेल हलव्याचे
सुगडाची रास घेऊन
नाते दृढ करुया विश्वासाचे
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

पतंग आपल्या नात्याची
दुर उंच उंच जावो
तिळगुळ देऊन एकमेकांना
नात्यातले गोडवे वाढो
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

यश मिळो तुम्हा उंच त्या पतंगासारखे
गोडवे राहोत आयुष्यात तुमच्या
गोड तिळगुळासारखे
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

भरभरून यश घेऊन येवो
संक्रांत ही येणारी
नात्यांमधील मधुरता
घेऊन येवो..
संक्रांत ही येणारी
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

भरारी मिळू दे तुम्हाला
संक्रांतीच्या पतंगासारखी
उजळून निघू दे आयुष्य
तपकिरी सुर्यकिरणासारखे
गोड होवू दे हे वर्ष
तिळाच्या बर्फीसारखे
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

Leave a comment