शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी | Share Market Investing In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून असंख्य लोक लाखो करोडो रुपये कमवत आहेत तसेच भरपूर लोक या क्षेत्रामध्ये आपलं करियर घडवत आहेत. तर कुणी या मध्ये काम धंदा नोकरी सांभाळून गुंतवणूक करून पैसे कमवत आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शेअर बाजार बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू शकता.तत्पूर्वी शेअर मार्केट बद्दल मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे म्हणूनच त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये देत आहे.

शेअर मार्केट म्हणजे काय ? | Share market in marathi

शेअर मार्केट असे ठिकाण आहे जेथे विविध कंपन्यांच्या शेअर्स ची खरेदी आणि विक्री केली जाते. येथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले जातात ज्याद्वारे लोक त्या त्या कंपनीचे भागीदारक बनतात. शेअर मार्केट ही एक मोठी आर्थिक बाजारपेठ आहे जिथे लोक मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करतात आणि विकतात.हा सर्व कारभार स्टॉक एक्सचेंज द्वारा चालविला जातो. भारतामध्ये अनेक स्टॉक एक्सचेंज आहेत जसे की NSE (National stock exchange) आणि BSE(Bombay stock exchange).

आपण स्टॉक एक्स्चेंज (BSE किंवा NSE) मधून थेट स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. आपली स्टॉक खरेदी किंवा विक्री ऑर्डर स्टॉक ब्रोकर द्वारे स्टॉक एक्सचेंजपर्यंत अंमलात आणली जाते.

स्टॉक ब्रोकर म्हणजे अशी एक एजन्सी किंवा कंपनी असते जी स्टॉक एक्सचेंज वर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी Authorised असते.

स्टॉक ब्रोकर च्या मदतीने आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो. जेव्हा आपण स्टॉक ब्रोकर कडे अकाउंट उघडतो तेव्हा आपले दोन अकाउंट ओपन केले जातात.

ट्रेडिंग अकाउंट: या अकाउंट द्वारे आपण स्टॉक ब्रोकर कडे शेअरची खरेदी किंवा विक्री साठी ऑर्द ऑर्डर देऊ शकतो.

डिमॅट अकाउंट: खरेदी केलेले शेअर्स एका ठिकाणी ठेवण्यासाठी या अकाउंट ची आवश्यकता असते.

खरेदी केलेला शेअर किंवा स्टॉक या अकाउंट वर जमा असतो. जेव्हा आपण शेअर विक्री करतो तेव्हा या अकाउंट मधून तो वजा केला जातो.

शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी आवश्यक कागदपत्र :

PAN card : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड एक अनिवार्य कागदपत्र आहे. 

Aadhar card: डीमॅट खाते उघडण्यासाठी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड हे आणखी एक अनिवार्य कागदपत्र आहे. बहुदा आधार कार्ड ओळख आणि पत्त्याचा पुरावा यासाठी वापरत येते.

Bank account : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते आवश्यक आहे.  तुम्हाला तुमचे बँक खाते तुमच्या ट्रेडिंग आणि डीमॅट खात्याशी लिंक करावे लागेल.

स्टॉक ब्रोकरची निवड करणे :

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य स्टॉक ब्रोकर ची निवड करणे आवश्यक आहे.

शेअर मार्केटमध्ये मुख्यता तीन प्रकारचे ब्रोकर असतात.

  • फुल सर्विस ब्रोकर
  • डिस्काउंट ब्रोकर
  •  बँक

प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या  प्राथमिकता आणि आवश्यकता असते त्यानुसार या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून योग्य ब्रोकर निवडावा.

लक्षात ठेवा स्टॉक ब्रोकर त्याने दिलेल्या सेवेंच्या बदल्यात ग्राहकांकडून शुल्क आकारतो त्याला ब्रोकरेज असे म्हणतात. स्टॉक ब्रोकरची निवड करताना  देत असलेली सुविधा आणि ब्रोकरेज यांची तुलना मार्केट मधील अन्य ब्रोकरशी  जरूर करावी जेणेकरून आपल्याला कमी फिस द्यावी लागेल व चांगली सेवा मिळेल.

जसे एक धावपटूला तो स्पर्धेत धावण्याच्या आधी त्याच्या डोक्यात स्पष्ट असतं  कसं आणि किती वेळात धावायचं त्याचप्रमाणे आपल्याला गुंतवणूक करण्यापूर्वी आपले लक्ष व उद्दिष्टे जाणून घेणे गरजेचे असते.

गुंतवणुकीचे लक्ष आणि उद्दिष्ट ठरवणे.

उदा: जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मुलाच्या भविष्यातील  शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाच्या दृष्टीने गुंतवणूक करायची असेल तर त्याच्या शिक्षणाला खर्च ध्यानात घेऊन तेवढे पैसे विशिष्ट कालावधी करता गुंतवणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपणास खालील गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

  • निवेश करण्याचे उद्दिष्ट.
  • निवेश करायचा कालावधी.
  • रिस्क घेण्याची क्षमता.
  • गुंतवणूक प्रकार (इक्विटी, कमोडिटी, करन्सी, म्युच्युअल फंड).

शेअर खरेदी व विक्री कसे करावे .

स्टॉक ब्रोकर कडे ट्रेडिंग अकाउंट व डिमॅट अकाउंट उघडल्यानंतर स्टॉक ब्रोकर करून ग्राहकांना युजर आयडी आणि पासवर्ड दिला जातो. ते युजर आयडी आणि पासवर्ड चा उपयोग  स्टॉक ब्रोकर ने दिलेल्या सॉफ्टवेअर मध्ये लॉगिन करून आपण आता गुंतवणूक करू शकतो.

स्टॉक ब्रोकर कडून आपल्याला विविध पर्याय दिले जातात ते खालील प्रमाणे :

गुंतवणूक प्लॅटफॉर्म :

  • मोबाईल ॲप द्वारे
  • वेब आधारित गुंतवणूक पॅनल
  • टर्मिनल सॉफ्टवेअर

कॉल वरून संपर्क करून

ऑफिसमध्ये स्वतः जाऊन

घरबसल्या आपण कुठूनही मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप च्या साह्याने गुंतवणूक करू शकता.

यूजर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून मोबाईल ॲप द्वारे ट्रेडिंग अकाउंट मध्ये लॉगिन करून आपण कोणत्याही स्टॉक चा शेअर खरेदी किंवा विक्री करण्याची ऑर्डर स्टॉक ब्रोकर पर्यंत देऊ शकतो. स्टॉक ब्रोकर ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंज(BSE किंवा NSE) वर पाठवतो. आणि जसा स्टॉक एक्सचेंज ऑर्डर पूर्ण करतो तसा आपल्याला शेअर खरेदी ऑर्डर पूर्ण झाल्याचा कन्फर्मेशन मेसेज मिळतो.

शेअर बाजारात दोन प्रकारचे ट्रेडिंग केली जाते.

इंट्राडे ट्रेडिंग : या प्रकारात एकाच दिवशी शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते. यामध्ये आपण शेअर आपल्याजवळ ठेवण्यासाठी घेतलेला नसतो तर शेअरच्या किंमतीत होणाऱ्या उतार चढावा चा फायदा घेऊन कमी वेळेत नफा मिळवण्याचा उद्देशाने खरेदी विक्री केली जाते. यासाठी ऑर्डर करताना इंट्राडे हा पर्याय निवडा.

डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग : यामध्ये आपण खरेदी केलेला शेअर आपल्याला पाहिजे तेवढे दिवस आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ठेवू शकतो.यासाठी शेअर खरेदीची ऑर्डर करताना डिलिव्हरी हा पर्याय निवडावा लागतो.

शेअर बाजारातून कोण कोणत्या प्रकारे लाभ कमवता येतो ?

लाभांश (Dividend Income) : जेव्हा एखादी कंपनी नफा कमावते, तेव्हा ती त्याचा काही भाग त्याच्या भागधारकांना लाभांश म्हणून वितरित करू शकते.  हा भागधारकांसाठी उत्पन्नाचा एक प्रकार आहे.

भांडवली नफा (Capital Appreciation) : जेव्हा तुम्ही शेअर्सची विक्री तुम्ही मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकली तेव्हा मिळवलेला हा नफा आहे.  शेअर बाजारातील गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या उत्पन्नाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे.

स्टॉक मार्केटमधील भांडवली वाढीद्वारे गुंतवणूकदार कसा नफा मिळवू शकतो याचे एक उदाहरण येथे आहे:

       समजा एक गुंतवणूकदार कंपनीचे १०० शेअर्स १०० रुपये प्रति शेअर दराने खरेदी करतो, म्हणजेच एकूण १०००० रुपयांची गुंतवणूक करतो .  पुढील काही महिन्यांत, कंपनी अनेक सकारात्मक घडामोडींची घोषणा करते, जसे की मजबूत तिमाही कमाई, वाढलेली विक्री आणि नवीन उत्पादन लॉन्च.  परिणामी, गुंतवणूकदारांची भावना सुधारते आणि अधिक गुंतवणूकदार स्टॉक खरेदी करण्यास सुरुवात करतात, मागणी वाढते आणि स्टॉकची किंमत वाढते. सहा महिन्यांनंतर, शेअरची किंमत प्रति शेअर १५० रू  पर्यंत वाढली आहे आणि गुंतवणूकदार सर्व 100 शेअर्स विकण्याचा निर्णय घेतो.  विक्रीतून गुंतवणूकदाराची एकूण मिळकत १५०००रू असेल, परिणामी ५०००रू भांडवली नफा होईल.  हा भांडवली नफा गुंतवणूकदाराने भांडवली वाढीद्वारे केलेला नफा दर्शवतो.

अर्थात, हे फक्त एक काल्पनिक उदाहरण आहे आणि प्रत्यक्षात, स्टॉकच्या किमती अस्थिर आणि अप्रत्याशित असू शकतात.  शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते आणि गुंतवणूकदारांनी कोणतेही गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी त्यांची गुंतवणूक उद्दिष्टे, जोखीम सहनशीलता आणि इतर घटकांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी काय काय काळजी घ्यावी :

 एखाद्या कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही योग्य मेहनत करणे महत्त्वाचे आहे.  तुम्ही घेऊ शकता अशी काही पावले येथे आहेत:

कंपनीचे संशोधन करा: कंपनीचे आर्थिक विवरण, व्यवस्थापन संघ, व्यवसाय मॉडेल, बाजारातील हिस्सा आणि प्रतिस्पर्धी पहा.  तुम्ही ही माहिती कंपनीच्या वेबसाइट, वार्षिक अहवाल, बातम्यांचे लेख आणि आर्थिक बातम्यांच्या स्रोतांद्वारे शोधू शकता.

उद्योगाचे विश्लेषण करा: एकंदर बाजाराचा आकार, वाढीची क्षमता आणि ट्रेंड यासह कंपनी ज्या उद्योगात चालते ते समजून घ्या.  त्याच उद्योगातील इतर कंपन्यांची कामगिरी पहा.

कंपनीचे आर्थिक आरोग्य तपासा: कंपनीचे उत्पन्न विवरण आणि रोख प्रवाह विवरणासह कंपनीच्या आर्थिक विवरणांचे पुनरावलोकन करा.  त्यांची नफा, महसूल वाढ, कर्ज पातळी आणि रोख प्रवाह पहा.

कंपनीचे मूल्यांकन विचारात घ्या: कंपनीच्या कमाई, महसूल आणि इतर आर्थिक मेट्रिक्सच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकची किंमत पहा.  कंपनीचे मूल्य जास्त आहे की कमी आहे हे ठरवा.

जोखीम समजून घ्या: प्रत्येक गुंतवणुकीत काही प्रमाणात जोखीम असते, त्यामुळे कंपनीमधील गुंतवणुकीशी संबंधित जोखीम समजून घेणे महत्त्वाचे आहे.  स्पर्धा, बाजारातील कल, नियामक जोखीम आणि कंपनीसाठी विशिष्ट जोखीम यासारख्या घटकांचा विचार करा.

आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या: गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही चांगली कल्पना आहे.  गुंतवणूक तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम सहनशीलतेशी जुळते की नाही हे निर्धारित करण्यात ते आपल्याला मदत करू शकतात.

या मुद्द्यांचा विचार करून, आपण एखाद्या विशिष्ट कंपनीमध्ये गुंतवणूक करावी की नाही याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता.

Leave a Comment